न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- मोबाईलवरुन आरोपीने फिर्यादीला फोन केला. फोनवर आरोपीने फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितली.
हा प्रकार (दि.२१) रोजी सायं. ५:०९ वाजता बौध्दनगर, बिल्डींग नं ०९, रुम नं ३८, पिंपरी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी किल्या ऊर्फ किरण कापसे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३२३/२०२३, भा.दं.वि. कलम ३८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















