न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- दुकानाची जागा बळकाविण्यासाठी फिर्यादीची आरोपी पत्नी व आरोपी मेहुणा यांनी फिर्यादीच्या दुकानात येऊन फिर्यादीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्यांना नकार दिल्यामुळे आरोपीने लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. तसेच फिर्यादीची पत्नी आरोपी हिने देखिल प्लॅस्टीकच्या पाईपने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने कोणत्यातरी कठीण वस्तुने फिर्यादीच्या तोंडावर मारुन त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी सकाळी ९.३० वाजता सर्व्हे नं. १८/१३/३, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी चौक, रहाटणी येथे घडली. फिर्यादी सुरेश शंकर जुनवणे (वय ५० वर्षे, धंदा-व्यवसाय, रा. स. नं. १८/१३/३, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी चौक, रहाटणी) यांनी आरोपी सोमनाथ अशोक तांबे (वय ३५ वर्षे, रा. मधुबन कॉलनी नं. १. मॅजेस्टीक हॉटेलच्या पाठीमागे, वाकड), महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी २६६/२०२३ भा.द.वि. कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















