न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- विज कनेक्शन तोडल्याच्या रागावरून आरोपीने फिर्यादी महावितरणच्या विदयुत सहायकाशी वाद घातला. त्यांच्या गाडीची चावी काढुन त्यांना इमारतीच्या बाहेर पडू दिले नाही. एकाचा गळा पकडून त्यास बुक्याने मारहाण केली. सह आरोपी २ याने फिर्यादीला पटयाने मारहाण केली. लोखंडी रॉड डोक्यात मारून दुखापत केली. सह आरोपी ३ याने शिवीगाळ करून धमकी देत बाहेर जावू दिले नाही. इतर एका तरुणाने फिर्यादीला लाथा बुक्याने मारहाण करून फिर्यादी शासकिय काम करण्यासाठी गेलो असताना तेथे फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण करत धमकी देवून तेथून बाहेर पडू न देता अटकाव केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २६) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास साई साम्राज्य सोसायटी, आंबेठाण रोड, चाकण येथे घडला. फिर्यादी मथुर चंद्रकांत चौधरी (वय २३ वर्षे, व्यवसाय नोकरी (विदयुत सहायक, चाकण शहर शाखा, महावितरण) रा. साईसमृध्दी सोसायटी, चाकण) यांनी आरोपी अक्षय पन्नालाल चोरडिया, आकाश पन्नालाल चोरडिया, पन्नालाल शंकरलाल चोरडिया (सर्व रा. साईसाम्राज्य सोसायटी आंबेठाण रोड, चाकण), एक अनोळखी तरुण (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी चौघांच्या विरोधात ३२६ / २०२३ भा.दं.वी क ३५३,३४२,३३२,३२३, ५०४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.