न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- चऱ्होली येथील प्राईड वर्ल्ड सिटीतील किंग्जबरी सोसायटी मधील पहिल्या मजल्यावर (दि. २६) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास कम्युनिटी हॉल येथे सोसायटी सभासदांची मिटींग आयोजित केली होती. या मिटींगमध्ये फिर्यादीने सदस्य कमिटी यांना ‘ सोसायटीचे बिल्डर आमचे मेन्टेनन्सचे पैसे परत कधी देणार व किती देणार? असे विचारले. त्याचा राग येऊन फिर्यादीच्या सोसायटीमध्ये राहणारे मुख्य आरोपी व सोसायटीचे चेअरमन सह आरोपी २ यांनी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी केली. मुख्य आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हाताचे बोट फ्रॅक्चर केले. सह आरोपी २ याने त्याच्या हातातल्या लहान लोखंडी धारधार हत्याराने फिर्यादीच्या पोटावर मारुन त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी मनोरंजनकुमार सत्येंद्र सिंग (वय ३६ वर्ष, धंदा नोकरी, रा. एफ-१, फ्लॅट नं. ४०५, किंग्ज बरी सोसायटी, प्राईड वर्ल्ड सिटी, च-होली, पुणे. मुळ रा. माहुली, थानातरिय्या, जि. सारंग, बिहार) यांनी आरोपी मंदिप सिंग (वय अंदाजे ३५ वर्ष), श्रीनिवास रकाले (वय अंदाजे ३५ वर्ष, दोघेही राहणार एफ-२, किंग्ज बरी सोसायटी प्राईड वर्ल्ड सिटी, च-होली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी दोघांच्या विरोधात १३१/२०२३ भा.दं.वि कलम ३२५, ३२४, ५०४, ५०६, ३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.