- तब्बल बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- १५ दिवसांपुर्वी संत तुकारामनगर येथे घरफोडी करणारी सराईत महीला गुन्हेगार ही पवनेश्वर मंदीर परीसरात फिरत आहे, अशी बातमी पिंपरी पोलीसांना मिळाली. सराईत महीलेस (दि. २५) अवघ्या २४ तासांत पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. मीरा अशोक साठे (वय ३० वर्षे, रा. रूम नं. ४, दुसरा मजला, तिलक हाईटस्, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अनिरूध्द सावर्डे, पो.हवा. ११८२ बारशिंगे, पो.ना. १७६२ करपे, पो.ना. १२२२ बागसिराज, पो.हवा. १५९१ भारती, पो.ना. १७६१ महाडीक, पो.शि. २९४६ शेख, पो.शि. २६५७ रेड्डी हे पिंपरी पो.स्टे येथे हजर असताना त्यांना बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली. शंकर आवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस स्टेशन यांना पो. हवा. ११८२ बारशिंगे यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी महीलेस ताब्यात घेवुन चौकशी करण्याचे आदेश दिले. स्टाफसह रवाना होवुन पवनेश्वर मंदीराजवळ जावुन शोध घेतला असता, बातमिदाराने दिलेल्या माहीतीप्रमाणे एक महीला दिसल्याने तीला पकडुन ताब्यात घेतले. नाव व पत्ता विचारता तीने आपले नाव मीरा अशोक साठे (वय ३० वर्षे, रा. रूम नं. ४, दुसरा मजला, तिलक हाईटस्, दापोडी) असे असल्याचे सांगितले. अधिक चौकशीकरीता पिंपरी पोलीस स्टेशन येथे आणले असता तीच्या ताब्यात काही दागीने मिळाले. तेव्हा तीची अधिक कसून चौकशी करता तीने १५ दिवसांपुर्वी संत तुकारामनगर पिंपरी, मागील वर्षी बौध्दनगर, पिंपरी येथे घर फोडुन तसेच दोन दिवसांपुर्वी देहुगाव येथे उघड्या घरात घुसुन सोन्याचे व चांदीचे दागीने चोरी केल्याचे कबुल केले.
पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २७०/२०२३, भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८० या गुन्ह्यात महिला आरोपीला अटक करण्यात आले आहे. पोलीस कोठडी दरम्यानचे तपासामध्ये सदर महीला आरोपी कडुन देहुरोड पोस्टे गुरनं १९९ / २०२३ भादंवि कलम ३८० व पिंपरी पोलीस स्टेशन ०२ / २०२२, भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० असे तीन गुन्हे उघड करण्यात आले असुन तीचेकडुन सोन्याचे गंठण, सोन्याचे मंगळसुत्र, मोहनमाळ, झुमके, अंगठी, टॉप्स तसेच चांदीची देवीची मुर्ती, नाणी, पैंजण असा एकूण ११,५७,३८० रूपयांचे सोन्याचे व चांदीचे दागीने व ४० हजार रूपयांची दुचाकी मोपेड असा एकुण ११,९७,३८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक अनिरूध्द सावर्डे पिंपरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
ही कामगिरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मनोजकुमार लोहिया पोलीस सह आयुक्त, संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त, विवेक पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ पिंपरी चिंचवड, प्रेरणा कट्टे सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग, शंकर आवताडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे, रूपाली बोबडे पोलीस निरीक्षक गुन्हे पिंपरी पोलीस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिरूध्द सावर्डे, पो. हवा. बारशिंगे, पो.हवा. हांडे, पो.ना. करपे, पो.ना. बागसिराज, पो.ना. भारती, पो.ना. महाडीक, पो.शि. शेख, पो.शि. जानराव, पो.शि. रेड्डी यांनी केली आहे.