न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- दुचाकीवरुन जात असताना महिला फिर्यादीची आरोपी तिघांनी गाडी अडवली. फिर्यादी महिलेच्या शर्टच्या खिशातून रोख रक्कम १,२०० रुपये धमकी देवून जबरदस्तीने काढुन घेतले. ही घटना (दि. २७) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास महात्मा फुले नगर, बीयर कंट्रोल कंपनीसमोर, मोहननगर, चिंचवड येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी करण उर्फे ससा ससाने (रा. दत्त नगर चिंचवड), शुभम फरतडे (रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड), इतर एक साथीदार (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३५५/२०२३ भादंवि कलम ३९२.३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.