न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- एकाच प्रभागात फिर्यादी व आरोपी हे कचरा गाडीवर काम करतात. दरम्यान दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे व संभाळ करण्याचे आमिष दाखवले. त्यांना वेळोवेळी लॉजवर नेवुन फिर्यादी महिलेच्या मनाविरुध्द व इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीरीक संभोग केला. फिर्यादी महिलेला गरोदर केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना ऑक्टोबर २०२२ पासुन ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान मधुबन लॉज कुदळवाडी, चिखली येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी प्रदिप बाबासाहेब घाटे (वय अं. ४० वर्ष, रा. तथास्तु पॅरेडाईज, फलॅट नं. ४१०, संत पाटील नगर, देहुगांव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २०५/२०२३ भादवि कलम ३७६, ३७६ (२) (एन), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.