न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- मामाच्या मुलाला का मारले? याचा जाब विचारला. त्याचा राग मनात धरुन पाच जणांनी बेकायदेशीर जमाव जमवला. फिर्यादी शतपावली करीत असताना त्यांना रस्त्यात गाठुन सह आरोपी २ याने फिर्यादीच्या हातावर दोन वेळा लोखंडी कोयत्याने मारुन त्यांना जखमी केले. तसेच सह आरोपी १, ३ व ४ यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी तेथून पळत जात असताना सह आरोपी २ याने तेथील एक दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागुन मारुन त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २६) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास साई इन्क्लेव्ह, निरंकारी भवन, स्मृती गार्डनसमोर, सार्वजनिक रोडवर, काळेवाडी येथे घडला.
फिर्यादी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा (धंदा-शिक्षण रा. शांती कॉलनी नं सी, विजयनगर, काळेवाडी) याने आरोपी नन्या ठोकळ (वय १८ रा. पिंपरी), जुनैद शेख (वय १९ रा. मिलींदनगर, पिंपरी), कृष्णा बॉक्सर (वय २० रा. सदर), रोहित रोकडे (वय १८ रा. सदर), राहुल रोकडे (वय १९, रा. सदर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी २९१/२०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५) म पोकाकलम ३७ (१) सह १३५ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.