न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- तुम्ही जर घर खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. राज्य शासनाने घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
राज्यातील रेडीरेकनरच्या दरात (Ready Reckoner) यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या रेडीरेकनर दराप्रमाणे, म्हणजे २०२२-२३ च्या रेडीरेकनर दराप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे. सन २०२२-२०२३ च्या दरात कोणताही बदल न करता तो २०२३-२०२४ या सालासाठीही लागू करण्यात यावा असं राज्य शासरनाच्या या आदेशात म्हटलं आहे.
राज्यात गेल्या वर्षी रेडीरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली होती. पालिका क्षेत्रात ८.८० टक्के, ग्रामीण भागात ६.९६ टक्के तर नगरपालिका क्षेत्रात ३.६२ टक्के वाढ करण्यात आली होती. कोरोनाच्या संकटामुळे त्या आधी दोन वर्षे रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.