न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर, बांधकाम परवानी, अग्निशामक, पाणीपुरवठा, आकाशचिन्ह परवाना, भूमी जिंदगी, प्राधिकरण भूखंड हस्तांतरण या विभागातून तब्बल एक हजार ८७९ कोटी ८३ लाखांचा महसूल मिळाला आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाला ७०० कोटी रुपयांचे उदिष्ट होते. या विभागाला ७२२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी एक हजार ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यंदा उत्पन्न कमी झाले आहे.
अग्निशामक विभागाला २०० कोटी रुपयांचे उदिष्ट होते. या विभागाने २३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. उदिष्टापेक्षा ३८ कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळाले. पाणीपुरवठा विभागाने ५७ कोटी ५८ लाख रुपयांची वसुली केली आहे.
आकाश चिन्ह व परवाना विभागाने १७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर प्राधिकरणाचे भूखंड हस्तांतरण फी, वारस नोंदीतून १५ कोटी आणि भूमी व जिंदगी विभागातून ३ कोटी ५० लाख असा एक हजार ८७९ कोटी ८३ लाखांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. तर, स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागातून लाखात उत्पन्न मिळाले असून ६१२ थकबाकीदारांना नोटीस दिल्या आहेत.