न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२३) :- गप्पा मारत असताना चेस्टा मस्करीमधे फिर्यादी हसले. राग आल्याने आरोपी १ याने फिर्यादीला उद्देशुन ‘ मी पण तुमच्या जातीवर बोलु शकतो ‘ असे म्हणुन हाताने फिर्यादीच्या थोबाडीत मारली. त्यावेळी तेथे फिर्यादीचे भाऊ ज्ञानेश्वर व सनी हे दोघे आले. आरोपी १ याने फिर्यादी हे हसल्याचा राग मनात धरुन त्याच्या राहत्या घरातुन त्याचा भाऊ सह आरोपी २ याला बरोबर आणुन दोघांनीही हातामधे लोखंडी कोयते आणुन फिर्यादीचा भाऊ ज्ञानेश्वर व सनी यांना डोक्यात, पाठीवर, हातावर कोयत्याने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ दमदाटी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ३१/०३/२०२३) रोजी रात्री ११.५० च्या सुमारास रुम नं. १०० सी, पत्राशेड टि. सी. आय. कंपनीजवळ, अजंठानगर, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी संतोष आसाराम सोनवणे वय – २०, रा. रुम नं. १००, सी, पत्राशेड, टि.सी.आय. कंपनीजवळ अजंठानगर, चिंचवड) यांनी आरोपी अंकुश शामराव कु-हाडकर (वय-२०), लव शामराव कु-हाडकर (वय १८, दोन्ही रा.माता रमाई चौक सी. पत्राशेड अजंठानगर चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी २१०/२०२३ भा.द.वि कलम ३०७,३२६, ३२४,५०४, ५०६,३४. भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) नुसार गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.












