न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२३) :- टपरीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला, देशी विदेशी कंपनीच्या वेगवेगळया फ्लेवरचा तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर व वैधानिक इशारा नसलेले सिगारेट पाकीटे आरोपीने विक्रीच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगले.
पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (दि. ३०/०३/२०२३) रोजी ९.०५ च्या सुमारास देहुरोड हददीतील कॅनबे चौक, देहु तळवडे रोड, तळवडे येथील एम के पान शॉप या टपरीवर कारवाई केली. एकूण १,०६,९४५ रकमेचा माल जप्त केला.
देहुरोड पोलिसांनी २३१/२०२३ भादवी कलम ३२८,२६९,२७०, २७२, २७३, १८८,३४ व सिगारेट व तंबाखुजन्य जाहिरात प्रतिबंध कायदा २००३ चे कलम ७, २० प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे. महेंद्र मनोहर भगेरीया (वय २६ वर्षे, रा. विठठलवाडी, होंडा शोरुमच्या पाठीमागे, देहुगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.












