न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- नेहमीप्रमाणे फळगाडी बंद करून फिर्यादी राहत्या घरी चालत जात असताना थरमॅक्स चौक येथे आले. काल झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांना तिघा आरोपींनी आपापसात संगणमत करून शिवीगाळ केली. त्यांना लाथाबुक्याने, दगडाने, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २) रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान घडला. फिर्यादी यश बाळू लगाडे (वय २४ वर्षे, व्यवसाय फळगाडी, रा. घर नं. ए/९५, कुंदन हुंदाई समोर, आंबेडकर वसाहत, निगडी) यांनी आरोपी सुजल पोटभरे (वय १९ वर्षे), यश पोटभरे, ओंकार (पुर्णनाव पत्ता माहित नाही, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात २२२ /२०२३ भादंवि ३२४,३२३, ५०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















