वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की, शिवीगाळ; फुगेवाडीतील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- वाहतुक नियमन व राँग साइडने येणा-या वाहनांवर फिर्यादी महिला वाहतूक पोलीस कारवाई करीत होत्या. दरम्यान आरोपी दुचाकी (एमएच१४एचएस२१०५) वरील चालक धरमींद मंजीत सिंग हा अशोका हॉटेल फुगेवाडीकडुन यामाहा शोरुमच्या दिशेने राँग साईडने फुगेवाडी चौकात येत होता. त्याला फिर्यादीने थांबवले. त्याचा लायसन निलंबनचा फॉर्म भरत असताना त्याच्या पाठिमागे बसलेल्या महिला आरोपीने फिर्यादीच्या हातातून लायसन हिसकावून तोडुन फेकुन दिले.
‘ तुला काय करायचे ते कर माझ्याकडे पण वर्दी आहे ‘ असे म्हणुन मोठमोठ्याने गलीच्छ भाषेत फिर्यादीला शिवीगाळ केली. आरोपी महिला फिर्यादीच्या अंगावर धाऊन गेली. त्यांच्या उजव्या डोळयावर व डोक्याला हाताने मारहाण केली. फिर्यादी शासकीय गणवेशात असताना त्यांच्या शर्टाची कॉलर पकडुन त्यांना ढकलून दिले. त्यामुळे फिर्यादी खाली पडल्या. फिर्यादी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. तसेच फिर्यादीशी झटापट करुन धक्काबुक्की केली व शिवीगाळ केली. फिर्यादी शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपी महिलेने सरकारी कामात अडथळा निर्माण करुन शासकीय काम करताना फिर्यादीला प्रतिबंध केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २) रोजी रात्री ८.४० वाजता फुगेवाडी चौक, पुणे-नाशिक रोड, फुगेवाडी येथे घडली. फिर्यादी महिला पोलीसाने महिला आरोपीच्या फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३०५/२०२३, भा.द.वि. कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करीत महिला आरोपीला अटक केली आहे.
















