न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२३) :- नॅनो कारने फिर्यादी कामावरुन घराजवळ आले. त्यावेळी फिर्यादीच्या तोंड ओळखीचा व परिसरात राहणारा आरोपी व त्याचे इतर दोन साथीदार हे हातात लाकडी दांडके घेवून गल्लीतील गाडया फोडत होते. फिर्यादी तेथे गेल्यावर त्यांनी फिर्यादीची नॅनो कारची काच देखील फोडली व फिर्यादी यांना गाडी बाहेर ओढले. ‘मादरचोद मी इथला भाई आहे, तुझ्या खिशातील पैसे काढून दे’, फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. आरोपी ने फिर्यादी यांच्या कानाखाली मारुन त्याच्या इतर दोन साथीदारांनी फिर्यादीस दोन्ही बाजुने पकडून आरोपीने फिर्यादीच्या जिन्सच्या उजव्या खिशात असलेले १२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना ढकलून दिले. त्यांनी गल्लीतील रोडवर पार्क केलेल्या रिक्षा, फोरव्हीलर कारदेखील जाताना फोडल्या व मोठमोठयांनी ओरडत दहशत माजवली, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ४) रोजी रात्री २.०० वाजता क्रांती सुर्यनगर, दिघी रोड, भोसरी येथे घडली. फिर्यादी सोहेल लाल पठाण (वय २६ वर्षे, धंदा केटरिंग, रा. सर्व्हे नं.२१२, क्रांतीसुर्यनगर, दिघी रोड भोसरी) यांनी आरोपी विन्या चव्हाण व त्याचे इतर २ साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ३०९/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३२३, ५०४,४२७,३४ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३,७ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















