न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२३) :- लग्नाची बोलणी करण्यासाठी फिर्यादी महिलेला आरोपीने त्याच्या घरी बोलावले. फिर्यादीच्या मनाविरुदध जबरदस्तीने शारिरीक संबंध केले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना जानेवारी २०२२ च्या शेवटच्या आठवडयात दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास ते ०४/०२/२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यत गणेशनगर रोड नं ०५, जगजीवन हॉस्पीटल शेजारी, बोपखेल येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी यशदिप शिवाजी शिंदे (वय २५ वर्षे, धंदा नोकरी, रा. बोपखेल) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १५६/२०२३ भा. दं. वि. कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















