- तरुणीच्या कुटुंबाला न्याय मिळून द्या; प्रदेश मंत्री अमित गोरखे यांची पोलिसांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२३) :- सासरच्यांनी विवाहित महिलेचा खून केला. तिला अपशब्द वापरून तिचा छळ केला. विवाहितेच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तरुणीच्या कुटुंबाला न्याय मिळून द्यावा, अशी मागणी राज्याचे भाजपा प्रदेश मंत्री अमित गोरखे यांनी शहर पोलीस आयुक्त, राज्याचे मुखमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून घरातील मंडळी ‘तू मागासवर्गीय जातीची आहेस’ म्हणून विवाहितेचा सतत छळ करीत होती. अनेकदा तिला घरातून बाहेर हाकलून देत होते. अनेकदा विवाहितेला मारहाण करून तिचा सासरच्यांनी छळही केला आहे. विवाहितेचा (दि. ३१ मार्च) रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घरातील पती, सासू, सासरे, दीर व पती यांनी मिळून गळा दाबून त्यांचा खून केला.
जयश्री राजेंद्र वाघमारे (वय १८ वर्षे, रा. बाबासाहेब तापकीर चाळ. तापकीरनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या पतीला अटक झाली असून तिचे सासू, सासरे, दीर यांना देखील तातडीने अटक करावी. केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, असे गोरखे यांनी निवेदनात म्हटले आहे.
















