- भर रस्त्यात रिक्षासह कार फोडली; एकावर जीवघेणा हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- हातातील कोयता हवेत फिरवत लोकांना मोठमोठ्याने ओरडुन ‘ माझे नाव स्वप्निल सगर आहे. मी थेरगावात राहतो. एक एक पुढे या, एका एकाला जिवच मारुन टाकतो’ असे म्हणत आरोपीने हातातील कोयता हवेत फिरवुन लोकांमध्ये दहशत निर्माण केली. तसेच सादिक पठाण यांच्या कार (एम.एच.१४/एच.जी. ६४२६) च्या बोनेट व भंपरवर कोयता मारला तसेच इतर वाहनांचे नुकसान केले आहे.
दरम्यान फिर्यादी हे रिक्षा (एमएच१४जीसी२४३२) मधुन त्यांचा मित्र अमोल भिताडे, पत्नी व दोन मुले यांच्यासह जात असताना हातातील कोयता व दगड हातात घेवुन रिक्षासमोर येवुन मोठमोठ्याने ओरडत, शिवीगाळ करीत रिक्षा आडवुन आरोपीने त्याच्या हातातील दगड रिक्षावर मारला. रिक्षाचे हुड फाटले. त्यानंतर आरोपीने त्याच्या हातातील कोयता जोरात फिर्यादीच्या गळ्याकडे फिरवला. फिर्यादीने त्यांची मान पाठिमागे घेतली व वार हुकविला, अन्यथा त्यांचा जीव गेला असता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ४) रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास धनगरबाबा मंदिराजवळ, थेरगाव येथे घडली. फिर्यादी नितीन नारायण भागडे (वय ३३ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा. दत्तात्रय खुटवड यांची रूम, नम्रता हौसिंग सोसायटी, धनगरबाबा मंदिराच्या पाठिमागे, थेरगाव; मुळ रा. मु.पो. राताळी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) यांनी आरोपी स्वप्निल संजय सगर (वय २२ वर्षे रा. थेरगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३३७/२०२३. भा.दं.वि. कलम ३०८, ५०४, ५०६,४२७, क्रिमीनल अमेंडमेंड अॅक्ट कलम ३ सह ७, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
















