न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- ‘ आम्हाला जेवायला दे ‘, अशी मागणी फिर्यादीच्या तोंड ओळखीच्या आरोपींनी फिर्यादीकडे केली. त्यावर ‘हॉटेल बंद झाले आहे’ असे फिर्यादीने आरोपींना सांगितले. माऊली पान शॉप येथे फिर्यादीचे मामा पान टपरी बंद करीत असताना त्यांना आरोपी यांनी सिगरेट मागीतली. फिर्यादीच्या मामांनी आरोपींना सिगारेट दिली. सिगारेटचे पैसे मागीतले असता आरोपींनी फिर्यादीच्या मामास हाताने मारहाण केली.
फिर्यादी भांडणे सोडवायला गेले असता आरोपीने रस्त्यावर पडलेला दगड फिर्यादी व त्यांच्या मामाच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले. फिर्यादी यांचा कामगार भांडणे सोडवायला आला असता आरोपींनी त्यालाही हाताने मारहाण केली. वाईट शिवीगाळ करुन ‘ आम्हांला जेवायला देत नाही का, आता आम्हाला जर जेवायला दिले नाहीस तर, तुम्हाला मारुन टाकील’ अशी धमकी देऊन आरोपी तिघे तिथून निघुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ४) रोजी रात्री ११.०० वाजता म्हेत्रे गार्डन रोडवरील माऊली हॉटेलच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर घडली.
फिर्यादी ज्ञानेश्वर इलप्या हेरवे (वय २६ वर्ष, धंदा व्यवसाय, रा. यशवंत सोसायटी, सुनिता यांचेकडे भाडयाने, अरविंद निवास, रुम नंबर १, मोरेवस्ती, चिखली) यांनी आरोपी दिनेश खरात (वय २२ वर्ष, पुर्णनांव व पत्ता माहीती नाही), त्याचे दोन मित्र (पुर्ण नांव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी तिघांच्या विरोधात २३९/२०२३ भा.दं.वि कलम ३२४,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















