न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- कंपनीमधून काम संपल्यानंतर फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ होडा स्प्लेंडर प्रो या दुचाकीवरून (एमएच१४डिव्हि३०११) किरण पांचाळ यांच्या घरी चक्रपानी वसाहत, भोसरी येथे जात होते. दरम्यान फिर्यादी हे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते.
धावडे वस्तीतील महाराष्ट्र हॉटेलसमोर (दि. २२.३.२०२३) रोजी सकाळी ८.२० च्या सुमारास अज्ञाताचा फोन आल्यामुळे गाडी चालवताना शर्टाच्या वरील खिशातून फोन काढण्याच्या नादात गाडीचा तोल जाऊन गाडी खाली पडली. त्यामध्ये फिर्यादीच्या मावस भावाच्या डोक्याला उजव्या बाजूस मार लागला. उजव्या हाताला खरचटले. तसेच फिर्यादीच्या तोंडाला, ओठाला आणि दात पडून ते जखमी झाले. मावस भाऊ हा बेशुध्द अवस्थेत असल्याने त्यास हॉस्पीटल येथे अॅडमीट केले. औषधोपचार चालू असताना तो मयत झाला आहे. त्याने गाडी चालविताना मोबाईलच्या नादात हयगय केल्याने स्वतः च्या मरणास कारणीभुत झाला. किरण नामदेव पांचाळ (वय ४० वर्षे) असे मयत फिर्यादीच्या मावस भावाचे नाव आहे.
फिर्यादी दत्तात्रय शंकरराव पोतदार (वय ४५ वर्षे, धंदा शेती, रा. काटे वस्ती कॉलनी नं. ३, शासकीय विश्रामगृह शेजारी, च-होली फाटा, आळंदी) यांनी मयत आरोपी किरण नामदेव पांचाळ (वय ४० वर्षे, रा:- सी/ओकोथंबीरे, शिवशंकर कॉलनी नं. ३, चक्रपानी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी मयत आरोपीच्या विरोधात ३१३/२०२३ भा.दं.वि. कलम ३०४ अ३३७,३३८ म.वा. का. कलम ११९.१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















