न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी अनोळखी दोन इसमांना घेवून आला. फिर्यादीला वाईट शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने डोक्यामध्ये व फिर्यादीचा चुलत भाऊ पिंटूकुमार याच्या डाव्या हातावर लोखंडी रॉडने व फायबरच्या पाईपने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे.
ही घटना (दि. ५) रोजी सकाळी ११.५० वाजता नागेश्वर पान शॉप, बो-हाडे वस्ती, इथोपीया सोसायटी समोर, मोशी येथे घडली.
फिर्यादी विकास कुमार तारकेश्वर राम (वय २० वर्षे, धंदा पान टपरी, रा. नागेश्वर पान शॉप, बो-हाडे वस्ती, इथोपीया सोसायटी समोर, मोशी) यांनी आरोपी मुस्तकीम खान (पुर्णनाव पत्ता माहित नाही) व दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तिघांच्या विरोधात १३७ / २०२३ भा.द.वि. कलम ३२६,५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















