न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- भारतीय जनता पार्टीच्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी महापौर राहुल जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे अभिनंदन करतो. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये भाजपाचे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकासकामे पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. पिंपरी-चिंचवड आणि परिसराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे. स्थापना दिनाच्या निमित्ताने संघटनात्मक पातळीवर आणखी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे मत आ. महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
















