न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- लग्नाचे अमिष दाखवुन आरोपीने फिर्यादीच्या मनाविरुध्द जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. वेळोवेळी बलात्कार केला. तसेच फिर्यादीकडुन अंदाजे एकुण तीन लाख रुपये घेवुन मानसिक व शारिरीक त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार जुलै २०१९ ते दि. १२/०९/२०२२ पर्यंत वेळोवेळी लेमन ट्री हॉटेल, हिंजवडी, आरोपीच्या घरी, गोल्डन स्वॅन आणि इतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घडला.
महिला फिर्यादीने आरोपी राकेश रविंद्रनाथ नायर (वय २२ वर्षे, रा. भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३२९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७६, ३७६ (एन) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.