न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- कोल्हापूरची वैभव ट्रॅव्हल्स बस (एमएच०९सीव्ही६३२७) ही प्रवासी घेण्यासाठी (दि. ९) रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास निगडी गावठाणातील हनुमान मंदिराच्या कडेला थांबली होती. तेवढ्यात बसचा पाठीमागून आलेल्या कारला धक्का बसला. कार चालकाने फिर्यादी बस चालकाकडे नुकसान भरपाई दे म्हणत शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्यानी मारहाण केली.
निशांत ट्रॅव्हल्सचे बंडु काळभोर हे मारहाण करणा-या इसमांना समजावून सांगत होते. त्यापैकी त्यांचा ओळखीचा आरोपी १ याने फोन करुन त्याचा भाऊ आरोपी २ व त्याचे इतर मित्र यांना बोलावून घेवून फिर्यादी व बंडू काळभोर यांना शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच आरोपी १ व २ यांनी रोडवर पडलेले ब्लॉक उचलुन फिर्यादी व बंडु काळभोर यांना फेकुन मारुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी बाळासाहेब गणपती फडनिस (वय ६७ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. राणे कॉलणी, काव्यायणी कॉम्प्लेक्स, कोल्हापूर, मुळ गाव मडीलगे खुर्द, ता.बुदरगड, जि. कोल्हापूर) यांनी आरोपी गणेश लुक्कर, पप्पु लुक्कर व त्यांचे सहा मित्र (नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २३७/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, १४१, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींना अटक केली आहे.