न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- कंपनीत नोकरी करीत असताना आरोपींनी एकत्रितपणे कंपनीचे आर्थिक नुकसान करण्यासाठी कट रचला. जाणीवपूर्वक अप्रमाणीकपणे कंपनीचे प्रात्यक्षिक देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये बिघाड करुन कंपनीचे अंदाजे दिड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले. तसेच आरोपी ४ याने सांगवी येथील ऑफिसमधील साहित्य जाताना चोरुन नेले. तसेच फिर्यादीने आरोपी यांना कंपनीच्या कामासाठी दिलेले लॅपटॉप, मोबाईल, सिमकार्ड व ईमेल्स कंपनीचे काम सोडुन जाताना जमा न करता बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन कंपनीचा डाटा चोरी केला.
तो डाटा व्यावसायीक स्पर्धक यांना देवुन करोडो रुपयांचे टेंडरिंगमध्ये आर्थिक नुकसान केले आहे. तसेच कंपनीची वेबसाईट जाणीवपूर्वक बंद पाडुन कंपनी बंद झाल्याबाबत कंपनीच्या कस्टमर यांना चुकीची महिती देवून अपप्रचार केला. तसेच कंपनीच्या सांगवी येथील मुख्य ऑफिसमधील डाटा चोरुन तसेच चुकिचा डाटा तयार करुन व्यावसाईक स्पर्धक यांना देवुन फिर्यादीच्या कंपनीचा व फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणुक करुन खुप मोठया प्रामणावर आर्थिक नुकसान करुन मानसिक त्रास दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना सन २०१७ पासुन आजतागायत वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने तसेच सांगवी येथील फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये घडली.
फिर्यादी मुकेश गोपाळ शर्मा (वय ५० वर्षे, धंदा- व्यवसाय, रा. अमरसुख, सर्व्हे क्र. ६६/१, संत तुकाराम नगर, एम.के. हॉटेल चौक, नवी सांगवी) यांनी आरोपी आरोपी १) रविंद्र शंकर जाधव (रा. सर्व्हे नं. ५६/०१/१७, कवडेनगर, एच.डी.एफ.सी. बँकेच्या शेजारी, पिंपळे गुरव), २) अभिषेक संजय जोशी (रा. ४३, रामतारा हौसिंग सोसायटी, बी/एच, चाणक्यपुरी औरंगाबाद), जयंत सुरेंद्रर बेहान (रा. १४६, सेक्टर ९/बी, सेक्टर ९, चंदिगढ १६०००९), ४) इंद्रजित लाल सिंग (रा. ४०२ एओओ कॉम्पलेक्स, सेक्टर-४८ / ए, सेक्टर- ४७ चंडिगढ) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी १६६/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४२७, ३८१, १२०(ब), माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (बी) (आय) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.