न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- मेडीकलसमोर उभे असताना आरोपी १ हा फिर्यादीला ‘तु माझ्याकडे रागाने का बघतो’ असे म्हणाला. त्यावर ‘मी कुठे तुझ्याकडे रागाने बघतो’ असे फिर्यादी आरोपीला म्हणाले. त्याचा राग आल्याने आरोपीने त्याचा भाऊ २,३ व ४ यांना बोलावुन घेतले. आरोपी १ याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोरात मारुन जबर दुखापत केली. आरोपी २ याने त्याच्या हातातील हॉकीस्टीक फिर्यादीच्या पाठीत मारली. ३ व ४ याने लाथाबुक्यानी मारहाण करुन दमबाजी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
मारहाणीची घटना (दि. १३) रोजी रात्री २२.०० च्या सुमारास महंमद मेडीकल, आंबेडकर रोड, देहुरोड) येथे घडली.
फिर्यादी उमर कासिम शेख (वय २२, धंदा कपडयाचे दुकान, रा. आंबेडकर रोड, देहुरोड) यांनी आरोपी १ छोटु लक्ष्मण जतने (रा. शिवाजी नगर, देहुरोड), २ सुरज लक्ष्मण जतने, ३ साहील लक्ष्मण जतने, ४ लक्ष्मण जतने यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी २५२/२०२३ भादवि कलम ३२६,३२३, ५०४, ५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.