न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- जुनी सांगवीतील आनंदनगर येथील सत्यविनायक गणपती मंदीरातील दानपेटीमध्ये भाविकांनी दान केलेले एका लाकडी दान पेटीमधील १०,००० रुपये आणि १५,००० रुपये एका स्टीलच्या दान पेटीमध्ये होते. एकुण अंदाजे रक्कम २५,००० रुपये अज्ञात चोरटयाने चोरी करुन नेली आहे.
चोरीची ही घटना (दि. १२) रोजी रात्री ९.०० ते (दि. १३) रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान घडली.
फिर्यादी अतीन तुकाराम टेके (वय ४२ वर्षे, धंदा, नोकरी रा. आनंद नगर, वारे बिल्डिंग, जुनी सांगवी) यांनी आरोपी अज्ञात चोरटा याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. सांगवी पोलिसांनी चोरट्याच्या विरोधात १७४ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.