- रावेत पोलिसांच्या कारवाईत तीन परप्रांतीय व्यावसायिक गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- कोणत्याही प्रकारचा गॅस रिफिलींगचा परवाना नसताना आरोपींनी धोकादायकरित्या व्यवसायिक गॅस सिलेंडर टाकीमधुन काढुन दुस-या सिलेंडर टाकीमध्ये रिफिलींग केला. गॅस सारख्या ज्वालाग्राही पदार्थाबाबत निष्काळजीपणा बाळगला. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीसांनी (दि. १४) रोजी ६.०० च्या सुमारास मुंबई- पुणे हायवे रोड लगत, पुनावळे येथील तोरणा हॉटेल जवळील पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई केली. तब्बल ६,०८,६५६ रूपये किमतीचे व्यवसायिक गॅस साहित्य जप्त केले.
रावेत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १७६/२०२३ भादवि कलक ४२०, २८५, ३४ सह जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३,७ सह एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
किशोरकुमार भाकरराम मेघवाल (वय २२ वर्ष, धंदा गॅस विक्री, रा तोरणा हॉटेल मागे, मुंबई पुणे हायवे, पुनावळे), रितेश सुरेश यादव (वय २१ वर्ष, धंदा गॅस विक्री, रा तोरणा हॉटेल मागे मुंबई पूणे हायवे पुनावळे), राजाराम लालाराम बिष्णोई (वय ३८ वर्षे, धंदा गॅस विक्री, रा तोरणा हॉटेल मागे मुंबई पुणे हायवे पुनावळे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.