न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- चाकण येथील महिंद्रा असेलो लिमीटेड येथुन फिर्यादीच्या कंपनीने मागणी केल्याप्रमाणे ६८३१ म्हणजे ६ टन ८३१ किलो रॉ मटेरीयल माल हा एम के ट्रॉन कंपनीत खाली करण्यासाठी आणला. या मालापैकी १७४२ किलो वजनाचा अर्धा मिटर बाय सव्वा मिटर बाय १०६ मिली जाडीच्या कच्च्या पत्र्याच्या सिटस हा माल कंपनीत खाली न करता आरोपी कंपनीबाहेर घेऊन गेले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २१/०१/२०२३) रोजी रात्री ७.५० च्या सुमारास एम के ट्रॉन कंपनी, नवलाख उंबरे, मावळ येथे घडली.
फिर्यादी तुकाराम बबन गवारे (वय ५८ वर्ष, व्यवसाय नोकरी, रा. शास्त्रीनगर, हरमिश हेरीटेज, येरवडा) यांनी आरोपी निलेश विठ्ठल ऊबे (रा. वडगाव मावळ), विनोगदकुमार दिनदयाळ सिंग, सागर राजेश शिंदे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ८३/२०२३ भा.दं.वि. कलम ४०८,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















