न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- वेगवेगळ्या कंपनीचा देशी-विदेशी दारूचा माल, त्यात देशी / विस्की/रम / ओडका/बिअर बॉटल, तसेच गावठी दारू तयार करण्याचे (कच्चा माल मिश्रण) रसायन व गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी गॅस शेगडी आणि १४ लिटरचा भारत गॅसचा सिलेंडर, असा ६१,२१५ रूपये किंमतीचा माल बेकायदेशिररीत्या स्वतःच्या जवळ बाळगला.
पिंपरी पोलिसांनी (दि. १३) रोजी रात्री १०.२० वाजता बिल्डींग नं. ४, तळमजला, भाटनगर, पिपरी येथील कमानीकडील कोप-याच्या खोलीत कारवाई केली. पोलीस आल्याचे पाहून आरोपी पळून गेला.
दिनेश भाट ऊर्फ डीके (वय ३० वर्षे, रा. बिल्डींग नं. ४, तळमजला, भाटनगर, पिंपरी) याच्यावर पिंपरी पोलिसांनी ४२५ / २०२३ महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) (फ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















