न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- चिंचवडेनगर-वाल्हेकरवाडी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास फिर्यादी त्यांची बुलेट दुचाकी पार्क करुन घरी गेले होते. सकाळी बुलेट घेण्यास गेले असता बुलेट ( एमएच१६सीझेड९४५९) चोरीस गेल्याची फिर्यादीची खात्री झाली.
फिर्यादी सुधिर पावलस गजभिव (वय ३८ वर्ष, धंदा नोकरी, रा. आबासाहेब चिंचवडे इंन्डस्ट्रीज, फिट फाईन शेजारी, वाल्हेकरवाडी) यांनी चोरीची तक्रार चिंचवड पोलीस स्टेशन येथे (दि. ८) रोजी दिली होती.
दरम्यान गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस बुलेट चोराचा शोध घेत होते. रस्त्याच्या ठिकाणी असलेले सी.सी.टी.व्हि. कॅमेरे तपासात असताना पोलिसांनी बुलेट चोराचा माग काढला. दगडोबा चौक, चिंचवडेनगर येथे सापळा रचुन चोरीस गेलेल्या बुलेटसह पोलिसांनी आरोपीला पकडले. धर्मराज दत्तु बंडगर असे अटक आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप-निरीक्षक गणेश माने, सपोफी दिपक खरात, पोहवा ८३२ जयवंत राऊत, पोना १६०३ देवा राऊत यांच्या पथकाने केली आहे.
















