न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- पर्यावरण विभागाशी संबंधित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीला गैरहजर राहिल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांना आयुक्त शेखर सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पर्यावरण विभागाअंतर्गत येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी व इतर प्रकल्पांच्या नियोजनाबाबत महापालिकेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होती. बैठकीपूर्वी आयुक्त स्वतः पावणेदहाच्या सुमारास पालिकेत पोहचले. परंतु, बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या असताना सहशहर अभियंता कुलकर्णी बैठकीला हजर नव्हते. याची गंभीर दखल घेत आयुक्त सिंह यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
यापूर्वीही २९ नोव्हेंबर २०२२ ला झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणविषयक कार्यशाळेला ते गैरहजर होते. त्यावेळी देखील त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कुलकर्णी यांच्याकडून लेखी खुलासा सादर करण्यास बजावण्यात आले आहे.
















