न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- मुंबई फायर ब्रिगेड तसेच राज्य अग्निशमन सेवेतील १३ अधिकाऱ्यांना व जवानांना शुक्रवारी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके प्रदान करण्यात आली. पिंपरी- चिंचवड महापालिकेचे माजी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांचाही यामध्ये समावेश आहे.
याचसोबत यावेळी अग्निशमन कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून राजभवन येथे करण्यात आला. अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झाले.
राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्नी जागरूकता निर्माण करण्याची आणि सोसायटी व उद्योगांचे नियमित ‘फायर ऑडिट’ करण्याची राज्यपालांनी सूचना केली.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांचेसह देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगर पालिका, प्रशांत रणपिसे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका, यशवंत जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, कैलास हिवराळे, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई अग्निशमन दल, विजयकुमार पाणिग्रही, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, संजय पवार, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, नाशिक, धर्मराज नाकोड,सहायक स्टेशन अधिकारी, नागपूर महानगरपालिका, राजाराम केदारी, लिडिंग फायरमन, पुणे महानगरपालिका, सुरेश पाटील, लिडिंग फायरमन, मुंबई अग्निशमन दल, संजय म्हामुणकर, लिडिंग फायरमन मुंबई फायर ब्रिगेड व चंद्रकांत आनंददास, फायरमन, पुणे महानगरपालिका यांचा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ देऊन सत्कार करण्यात आला.


















