- पिंपरी चिंचवडच्या तहसीलदारपदी अर्चना निकम यांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- राज्य शासनाने पुणे विभागातील ३२ तहसीलदारांची बदली केली. पिंपरी चिंचवडच्या तहसीलदारपदी अर्चना निकम यांची नियुक्ती केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांची सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्य दंडाधिकारी (सेतू) या पदावर बदली झाली आहे.
महसूल खात्याने उपविभागीय अधिकाऱ्यांपाठोपाठ आता तहसीलदारांच्याही बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील ३२ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३ तहसीलदारांचा समावेश आहे.
बारामतीच्या तहसीलदारपदी गणेश शिंदे, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदारपदी अर्चना निकम, मुळशीसाठी रणजित भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भात महसूल विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी आदेश जारी केले आहेत. मातब्बर तहसीलदारांना पुणे विभागाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने आहे.
यात मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली धानोरा तहसी- लदार (जि. गडचिरोली). येथे तर मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांना शिरूर कासार (जि. बीड), आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांची बदली अमरावती जिल्ह्यात, तर बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात केली. वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांची रवानगी चंद्रपूर जिल्ह्यात. बालाजी सोमवंशी यांची बदली नागपूर जिल्ह्यात केली आहे. याबाबतचे आदेश महसूल विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी काढले आहेत.















