न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- ७ वर्षीय अल्पवयीन मुलास आरोपीने जंगलात नेले. त्याच्यावर तिथं लैंगीक अत्याचार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १६) रोजी रात्री ७.३० च्या सुमारास च-होली येथे उघडकीस आला.
या प्रकरणी महिला फिर्यादीने आरोपी सुजीत हरीपाद मल्लीक (वय ३१ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १७५/२०२३भा.द.वि.स.कलम ३७७, बालकाचे लैगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम -३,४.५ (एल) (एम),७,८,११,१२ नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.