न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- सन २००४ पासुन ते (दि. १६) पर्यंत दिघी येथे घरगुती कारणावरून फिर्यादीच्या विवाहित बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पतीने तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करुन मानसिक व शारीरीक त्रास देत क्रूर वागणुक देवून छळ केला.
तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. (दि. १६) रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने घराच्या छताच्या लाकडी तुळईला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी हेमंत रामदास मेगडे (वय ३० वर्ष) यांनी आरोपी सोमनाथ बबन साकोरे (वय ४० वर्ष, रा. दिघी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी १७३/२०२३ भादवि कलम ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.