न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- हवेत गोळीबार करुन दोघांनी (दि. १६) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास लोकवस्तीमध्ये दहशत पसरविली. सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेसाठी धोकादायक कृत्य केले. सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली.
त्यांच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल किंमत रुपये २५,०००, दोन जिवंत काडतुस किंमत रुपये १०००, वीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा सी.डी. डिलक्स (एमएच१२सीझेड७९८५) असा एकुण ४६,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई (दि. १७) रोजी ११.१५ च्या सुमारास वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर, जुनी सांगवी येथे घडली.
सांगवी पोलिसांनी दोघांवर १८१/२०२३ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेडमेंट अॅक्ट ३ व ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सुजल राजेंद्र गिल (वय १८ वर्षे ०३ महिने, रा. विनायक नगर, गल्ली नं. १, नवी सांगवी), रिहान आरिफ शेख (वय १९ वर्षे, रा. भाऊ नगर, साठ फुटी रोड, पिंपळे गुरव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.