न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२३) :- कंपनी कामावरून सुट्टी झाल्यानंतर घरी जात असताना फिर्यादीच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन जण फिर्यादीजवळ आले. त्यांच्या दुचाकीला क्रॉस मारुन आरोपीने त्याची दुचाकी फिर्यादी पुढे थांबवली. ” तुला लय माज आला आहे काय, तू नेहमीच ट्रान्सपोर्ट गाडयांच्या शॉर्टजबाबत माहिती व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकतो “, असे म्हणून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताने, बुक्क्याने, पोटावर, अंगावर मारहाण केली. त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील दुचाकीच्या चावीने फिर्यादीच्या कपाळावर व उजव्या डोळयाजवळ माराहण करून जखमी केले. तसेच एका इसमाने तेथील दगड उचलून फिर्यादीकडे फेकला. परंतू तो हुकला. फिर्यादी जखमी झाल्याचे पाहून दोघा आरोपीनी छोटया हाराळे व सागर हाराळे नाव आहे, हे लक्षात ठेव, तसेच तू व्हॉटसअॅपवर ट्रान्सपोर्ट बाबत माहिती टाकायची नाही. तू आमच्या विरुद्ध पोलीसात तक्रार दिली तर तुला येथे काम करून देणार नाही ” , अशी धमकी देऊन त्यांच्या दुचाकीवरून तेथून निघून गेले.
फिर्यादी यांना झालेली मारहाण ही विशाल येळवंडे व सचिन येळवंडे यांच्या सांगणेवरून आरोपी यांनी केली असल्याचा फिर्यादी यांना संशय आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १८) रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत एसीपीएल क्युरिअर कंपनी जवळ घडली.
फिर्यादी मंगेश रामनाथजी पराते (वय ४२ वर्षे, चिखली, पाटीलनगर, मुळगाव नरखेड) यांनी आरोपी सुरज प्रभाकर हराळे (वय २३, रा. मोहननगर, चिंचवड), सागर प्रभाकर हराळे (वय २९, धंदा ड्रायवर, मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २०५/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ३४१,५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.
















