न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने चिंचवडमधील एका मॉलमध्ये घेण्यात आलेल्या ‘मॉक ड्रिल’नंतर काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाच मोठ्या मॉलना नोटीस देण्यात येणार आहे. महापालिकेने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली की नाही, याची पाहणी करण्यात येणार आहे.
महापालिका मुख्यालयात ‘मॉक ड्रिल’नंतर काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानुसार मुख्यालयाचे अग्निशामक लेखा परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानंतर एका महिन्यात आठ क्षेत्रीय कार्यालये, सर्व रुग्णालये, नाट्यगृहे, प्रेक्षागृहांचेही लेखा परीक्षण करण्यात येणार आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिका, अतिरिक्त आयुक्त, प्रदीप जांभळे-पाटील म्हणाले.
















