न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- पहाटेच्या सुमारास खासगी टेम्पोतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबईला गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना मिळाली. देहूरोड पोलीस आणि गोरक्षक यांनी तो टेम्पो किवळे येथे सापळा लावून पकडला.
टेम्पोच्या आत कांदा आणि बटाट्याच्या गोणी होत्या. आतमध्ये गव्हाचा भुसा असलेल्या पन्नास गोणी आढळल्या. त्याखाली आठ टन गोमांस सापडले. धाराशिव येथून मुंबईला हे गोमांस घेऊन जात असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. आठ टन गोमांसासह २७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
टेम्पोचालक दीपक रफिक पैगंबर आणि टेम्पोमालक शौकत हुसेन यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (क), ९(अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपकला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
















