न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- बेकरीमध्ये हाऊसकिपींगचे काम करीत असलेल्या आरोपीने फिर्यादीच्या पिडीत अल्पवयीन मुलीला जाता येता अडवले. तिला भेटायला बोलावले. त्यास पिडीत मुलीने नकार दिला असता त्याने पिडीत मुलीचा हात पकडुन “तु जर मला भेटायला आली नाही तर मी तुझे फोटो वायरल करेल” अशी धमकी दिली. (दि. १२) रोजी दुपारी १.३० च्या सुमारास पिडीत मुलगी घराच्या पाठीमागे असलेल्या बाथरुममध्ये गेली. त्यावेळी आरोपी हा आधीपासुनच बाथरुममध्ये होता. त्याला बघुन पिडीत मुलगी ओरडली. त्याने पिडीत मुलीचे तोंड दाबुन तिला मिठी मारली. “तु जर कोणाला काही सांगितले तर मारुन टाकेल” अशी धमकी दिली. त्यानंतर (दि. २०) रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास आरोपी हा फिर्यादीच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसला. घराची आतुन कडी लावुन घराची लाईट बंद केली. फिर्यादीच्या पिडीत मुलीला मिठी मारुन तिच्या अंगावरील कपडे फाडुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला. घराची बाहेरुन कडी लावुन निघुन गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना आठ दिवसापुर्वी ते (दि. २०) रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान काळेवाडी येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी प्रिन्सकुमार विजय ठाकुर (वय २१ वर्षे, काळेवाडी) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ३९४ /२०२३ भा.दं.वि. कलम ३५४, ३५४(अ), ३५४ (ड), ४५२, ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम कलम ७ व ८ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















