न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- घरास लॉक लावुन बंद करुन परीवारासह कपडे खरेदीसाठी फिर्यादी गेले होते. अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संमतीशिवाय बंद घराचा कडी कोयंडा कशाचे तरी साहयाने तोडुन फिर्यादी यांचे घरामध्ये प्रवेश केला.
३९,८५० रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने व १०,००० रूपये रोख रक्कम चोरी करुन नेली. ही घटना (दि. १९) रोजी रात्री ६:०० ते ७:३० पर्यंत विकासनगर, किवळे येथे घडली.
फिर्यादी महादेव हरीभाउ कडलग (वय ५५ वर्षे, विकासनगर किवळे, देहूरोड) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी २६०/२०२३ भा द विकलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















