न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२३) :- निगडीत फिर्यादीच्या घरी त्यांची मुलगी एकटीच होती. (दि. २०) रोजी रात्री १२.०० च्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या घरामध्ये घुसला. फिर्यादीच्या मुलीचा हात धरला.
तीच्या अंगावरील ड्रेस ओढुन फाडला. तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
महिला फिर्यादीने मनोज रामचंद्र सिह (वय २५ वर्षे, रा. रुपीनगर, तळवडे) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. निगडी पोलीसांनी २६९/२०२३ भा.द.वि.क. ३५४,४५२ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
















