न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२३) :- गावाची जत्रा असल्याने हैद्राबाद येथे फिर्यादी गेले होते. जाताना दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेली १,३८,००० रुपये रोख रक्कम व एक सॅमसंग कंपनीचा जे ७ प्रो मॉडेलचा ५००० रुपये किंमतीचा जुना मोबाईल, असा एकुण १,४३,००० चा मुद्देमाल होता. फिर्यादीच्या दुकानात काम करणारे कामगार आरोपी १ व २ यांनी तो चोरुन नेला आहे.
हा प्रकार (दि. १३) रोजी पहाटे ४.३० वाजता. फिर्यादीचे दुकान शिव डेकोर, डांगे चौक, दत्तमंदीर वाकड रोड, खिंवसरा ट्रेड सेंटरजवळ, थेरगांव येथे घडला.
फिर्यादी मानसिंग रामु पूजारी (वय ३१ वर्षे, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांनी आरोपी प्रकाश गिरी गोस्वामी (वय २७ वर्ष, व त्याची पत्नी), महिला आरोपी (दोघे रा. गया गोस्वामी, रजरवारा, कटनी, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ३९८/२०२३ भादवि कलम ३८१,३४ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















