न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२३) :- जुनी सांगवीतील कावेडीया ज्वेलर्समध्ये आरोपी दोघे आले. त्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या दुकानातुन २९६.४३० ग्रॅम वजनाचे १७,८४,५०८ रुपये किंमतीचे शुद्ध सोने घेऊन गेला. त्या बदल्यात सोन्याचे दागिने बनवून देतो, असे सांगुन सोने घेऊन पळून गेला. फिर्यादीची फसवणुक केली.
हा प्रकार (दि.३०/०३/२०२३ ते ०८/०४/२०२३) पर्यंत कावेडीया ज्वेलर्स आणि प्रशांत गोल्ड स्मिथ गणेश पेठ, पुणे येथे घडला. फिर्यादी रवी जगदीश कावेडिया (वय. ३६ वर्षे, जुनी सांगवी) यांनी आरोपी प्रशात सुनिल ससमल (वय ४० वर्षे, राहणार- ६३०, रविवार पेठ, फ्लॅट नंबर ८, अब्दल दर्गा जवळ, रविवार पेठ, पुणे), सुमन अजित ससमल (वय २३ वर्षे, धंदा-नोकरी, रा. ३९२, गणेशपेठ, पुणे कारखान्याचा पत्ता- प्रशात गोल्ड स्मिथ नावाने ३९२, दुसरा मजला, ममता निवास, गणेश पेठ, पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी १९१/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















