न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२३) :- गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी प्रोव्हिशन माल, लागणारे रसायण व तयार हातभटटीची दारुचा बेकायदेशिररित्या साठा केला.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी (दि. २१) रोजी दुपारी १.३५ च्या सुमारास शिरगावच्या पवना नदीच्या कडेला कारवाई केली.
तब्बल १०,१०,५०० रूपये किमतीचा माल जप्त केला. आरोपी दोन महिलांचा शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत. शिरगाव पोलिसांनी दोघींवर १०८/२०२३ महा दारुबंदी अधिनियम कलम ६५ (क). (फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.