न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गाडी काढण्यावरुन दोघांचा वाद झाला होता. तेव्हा आरोपीने फिर्यादी यांच्या जावयाला स्टिलच्या कडयाने तोंडावर ४ ते ५ बुक्या मारुन जखमी केले होते. तेव्हा फिर्यादी हे आरोपीला पकडण्याकरीता गेले असता तो तेथून पळुन गेला. ११. ३० च्या सुमारास फिर्यादी हे त्यांचा मुलगा व नातू, सुन यांच्या सोबत घरी असताना आरोपी हातात कोयता घेवुन फिर्यादी यांच्या घरात शिरला.
त्याने फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी केले. तेव्हा फिर्यादी यांचा मुलगा व नातु फिर्यादी यांना वाचवण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला व नातवाला कोयता मारुन जखमी केले. तेव्हा फिर्यादी यांच्या घरातील लोकांनी आरडा ओरडा केल्यावर त्यांच्या बिल्डिंगमधील शेजारी राहणारे लोक जमा झाले. तेव्हा आरोपीने हातात कोयता फिरवत ‘कोणी मध्ये आला तर त्याला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. शेजारी राहणारे लोक घाबरुन घरामध्ये गेल्यावर आरोपी तीथुन निघुन गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ३०/०४/२०२३) रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान मिलिंदनगर, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी प्रभाकर बाबुराव सोनवणे (वय ६५ वर्षे, मिलिंदनगर, पिंपरी) यांनी आरोपी करण ओव्हाळ (वय अंदाजे ३० वर्षे, मिलिंदनगर, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ४८७ / २०२३भा.दं.वि. कलम ३०७,४५२, ३२४,५०६ आर्म अॅक्ट ४ (२५). ४ (२७). क्रिमीनल लॉ अमेटमेंट कलम ३, ७, महा. पो. अधि. नियम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.