न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- ‘कॅनडा येथे नोकरीला लावतो’ असे आमिष दाखवीत फिर्यादीकडुन आरोपीने पैसे घेतले. तारिख निघुन गेली तरीही फिर्यादी व साक्षीदार यांना नोकरी लावली नाही. म्हणून त्यांनी प्रोसेस कॅन्सल करण्यासाठी सांगितली. त्यामुळे आरोपीने फिर्यादीला ५०,००० रुपये परत केले. परंतु त्यांचे उर्वरित २,००,००० रुपये व साक्षीदार यांचे ४,००,००० रुपये परत न देता फिर्यादी व साक्षीदार यांची ६,००,००० रुपयांची फसवणुक केली.
ही घटना (दि. १/०१/२०२३ ते दि. २७/०४/२०२३) दरम्यान नोकरी पॉईन्ट, हिंजवडी येथे घडली.
फिर्यादी कार्तिक मोहपत चामट यांनी आरोपी मुकेश कुमार (रा. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ५७३/२०२३ भा.दं.वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.