न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- सरपंच पदाचा राजीनामा दयावा म्हणून आरोपींनी हातामध्ये सिमेंटचे ब्लॉक घेतले. फिर्यादीच्या फॉर्चूनर गाडीचे दगड मारून नूकसान केले. संगनमत करून फिर्यादीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारला. ‘तूला जिवे ठार मारतो’ असे म्हणत त्यांना जखमी केले.
हा प्रकार (दि. ३०/०४/२०२३) रोजी रात्री १.१५ वाजता. माणगाव, देवी मंदिरासमोर, माणगाव, ता मूळशी, जि पूणे. येथे घडला.
फिर्यादी सचिन मच्छिंद्र आढाव (वय ३९ वर्षे, गणेशनगर, डांगे चौक) यांनी आरोपी रवि बोडके, राज बहिरट, प्रदिप पारखी, सोन्या बोडके, सचिन बोडके (सर्व रा. माण) व इतर १० ते १२ इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ५७२/२०२३ .भा.द.वि. कलम ३०७, ५०६, ४२७, १४३, १४४, १४७, १४८, १४९ महा पो अधिनियमचे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.