न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- दुकानात जावून महिना दोन हजार रुपयाची खंडणी मागितली. ती न दिल्यास फिर्यादीला पाहून घेण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या परिसरात जीवीतहानी, मालमत्तेचे नुकसान तसेच दहशत करण्याच्या उद्देशाने कॅनमध्ये पेट्रोल घेवून फिर्यादी यांच्या घराच्या समोरील भिंतीवर व घरासमोर पार्क केलेल्या मोटर सायकलवर पेट्रोल ओतून त्यास आग लावून अंदाजे १.५०,००० रुपये किंमतीचे नुकसान केले.
फिर्यादी व परिसरात राहणारे लोक तेथे आले. आरोपीने त्याच्या कंबरेला लावलेला मोठा कोयता काढून हातात घेवुन वर करुन मोठ मोठयाने ओरडत ‘तुम्ही जर माझ्या जवळ आला तर, तुम्हाला कापून टाकेल. मी इथला भाई आहे, मला कोण आडवतय तेच पाहतो’, असे म्हणत दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३०/०४/२०२३) रात्री २.३० च्या सुमारास भोसरी येथे घडली. फिर्यादी दत्तात्रय नथुराम दिघे (रा. भोसरी) यांनी आरोपी कुंदनसिंग टाक (वय अं. १९ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३८६/२०२३भा.दं.वि. कलम ४३६.३८७,५०६ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), किलॉ. अ. अॅस्ट कलम ३,७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.